Posts

Showing posts from July, 2022

पाटील साहेबांनी चाटली लाखोंची मलई ? कडेगाव महावितरण मधील भ्रष्टाचार थांबणार कधी...?

Image
भ्रष्टाचार की पोल खोल .. कडेगाव महावितरण मधून जनतेची लूट केली जातेय , सर्वसामान्य लोकांना काँट्रॅक्टरच्या जाळ्यात ढकलले जातेय हे आपण TLN मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी दाखवले आहेच. दलाल कॉन्ट्रॅक्टर आणि महावितरणचे पाटील साहेब यांच्यात साटेलोटे असल्याचा धक्कादायक खुलासा स्वतः एका कॉन्ट्रॅक्टरने भ्रमणध्वनी वरून केला आहे त्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा TLN मराठीच्या हाती लागले आहे दरम्यान कॉन्ट्रॅक्टर याने बोलताना मला पाटील साहेबांनी मदत केली असे सांगितले आहे कडेगावच्या महावितरण मधील पाटील साहेब कोण याचा शोध मात्र अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागलेला नाही  यासंदर्भात महावितरणच्या विटा शाखेतील वरिष्ठ अधिकारी साहेबांना यांसदर्भात विचारणा केली असता कडेगावच्या महावितरण मध्ये पाटील साहेब 2 असल्याने खरा पेच निर्माण झाला आहे  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय  कारवाई केली..? आज दलाल त्यांचे पंटर आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या मुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे आणि जर भ्रष्ट प्रकार उगडकीस येऊ लागला तर वरिष्ट अधिकारी सुद्धा त्यांची पाठराखण करत आहेत यामुळे ते सुद्धा य

जिल्हा परिषद निवडणुकीत तडसर गट ठरणार चुरशीचा

Image
काय सांगताय मामा....! TLN मराठीच्या काय सांगताय मामा ह्या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. सांगली जिल्हा परिषदेची निवडणूकीची आरक्षण सोडत झाली आणि कडेगाव तालुक्यात अनेक पालते पडलेले हिरे सरळ होऊन चमकू लागलेत. आपल्या नेत्यापुढे मी किती श्रेष्ठ आणि माझे नेतृत्व किती मोठे याचे प्रात्यक्षिक आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेच. कडेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने राजकीय चुरस आहे ती म्हणजे तडसर जिल्हा परिषद गटात कारण याठिकाणी सर्वसाधारण आरक्षण लागले आहे.  यामुळे बरेच इच्छुक , हौसे गवसे आणि नवसे मैदानावर शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत कोण किती श्रेष्ठ हे सिद्ध करीत आहेत.  अर्थातच आपल्या नेत्याच्या नजरेत मी मोठा आहे अन मलाच उमेदवारी द्यावी अशी प्रतिकृती सध्या इच्छुक बनवत आहेत. कोणत्या गावात सर्वात जास्त इच्छुक पाहायला मिळाले..? पूर्ण कडेगाव तालुक्यात आणि तडसर जिल्हा परिषद गटात तडसर या गावात तिकिटं मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे पण यातील बहुतांश इच्छुक हे काँग्रेस विचाराचे आहेत आणि प्रत्येकाला काँग्रेस मधून तिकीट पाहिजे अरे पन बाबांनो तिकीट एकच आहे अन ते कोणातरी एकाला मिळ

संभाजी बापूंना उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी लावला जोर तडसर जि. प गटासाठी संभाजी शेळके यांच्या नावाची होतेय चर्चा

Image
नेत्याठी कार्यकर्त्यांची मागणी तडसर जिल्हा परिषद गटातून  संभाजी शेळके यांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा अट्टास   तडसर गावचे मा.उपसरपंच यांना उमेदवारी मिळावी म्हणून खऱ्या अर्थाने गावातील कार्यकर्ता वर्गाने मोठ्या प्रमाणात जोर लावला आहे मा.उपसरपंच आणि एक सामाजिक नेतृत्व संभाजी सुबराव शेळके यांचा लोकांशी असलेला जनसंपर्क तसेच मनमिळाऊ स्वभाव आणि लोकांशी असलेली आपुलकीची गुंफण यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे  त्यांच्यामध्ये  काम करण्याची ओढ आणि धकम सुद्धा आहे दहा वर्षे उपसरपंच पदावर असताना त्यांनी दिनदूबळ्यांची , गावातील नागरिकांची मदत मोठ्या प्रमाणात केली आहे , कोणाचं तहसीलचं काम असुदे किंवा  कोणाचं बँकेचं संभाजी शेळके (बापू) हे नेहमी सर्वसामान्यांना मदत करत असत   अशा विविध प्रकारच्या समाजातील अडचनिवर बारकाईने लक्ष देण्याची बांधिलकी जपण्याचे काम संभाजी बापू करत आहेत. त्यांच्या याच अनुभवाची साथ या तडसर गटासाठी मिळावी अशी मागणी युवकांमध्ये दिसून येत आहे. तडसर जिल्हा परिषद गटातून युवकांची आणि जेष्ठांची त्यांच्या उमेदवारीचा अट्टास लावला असून  काँग्रेस पक्षाशी एकन

तडसर जिल्हा परिषद गटातून सुरज पवार यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी गटातील नागरिकांनी धरला जोर !

Image
नुसत्याच आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका लागल्या असून इच्छुकांची आत्ता रांग लागायला चालू झाली आहे तडसर जिल्हा परिषद गट तसा चुरशीचा गट मानला जातो ह्या गटाचे सर्वसाधारण मतदान 35 हजारांच्या दरम्यान आहे  जिल्हा परिषेदेसाठी या गटात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे तर तडसर पंचायत गणात देखील सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे  राजकारण करत असताना त्याला समाजकारणाची जोड असणे महत्त्वाचे आहे . आणि अशातच तडसर गटातून एक चेहरा समोर येतो म्हणजे सुरज पवार यांचा तडसर गावचे युवा आणि काँग्रेसचे  धडाकेबाज नेतृत्व सुरज पवार यांच्या सामाजिक सेवेचा आरसा हा नेटका आणि स्पष्ट आहे. सुरज श्रीधर पवार यांनी आपल्या भक्ति फाउंडेशन तर्फे अनेक दानधर्म केला आहे त्याच बरोबर ते स्कूल कमिटी सदस्य आहेत त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाला एक मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे त्यांचे आजोबा 1972 ला गावचे सरपंच होते त्यांचे वडील श्रीधर पवार हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत  सामाजिक कामात त्यांचे कुटुंब नेहमी पुढे अग्रेसर असते .  तडसर मधील रयत शिक्षण संस्थेतील सभागृह बांधून देऊन त

तडसर जिल्हा परिषद गटातून पैलवान रणजीत पवार यांची सर्व तालुकाभर चर्चा.

Image
अगदी तोंडावर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील सांगली जील्हा आणि कडेगाव पलूस तालुक्यातील  नुकत्याच  आरक्षणाच्या जागा  जाहीर झाल्या.  यामध्ये तडसर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आणि पं.ग. सर्वसाधारण महिला , शाळगाव प.स.गण सर्वसाधारण असा आरक्षण पडलेल आहे .       काँग्रेसकडून तडसर गावचे महाराष्ट्र चॅम्पियन , मल्लसम्राट केसरी पैलवान रणजीत पवार यांच्या नावाच्या चर्चेन कडेगाव तालुक्यात जोर धरला आहे. तडसरच्या जिल्हा परिषद गटात तडसर ,शाळगाव 2 पंचायत समिती गण आहेत. पैलवान रणजीत पवार हे तडसर गावचे जेष्ठ नेते मा.जी.परिषद सदस्य व्यंकटराव पवार यांचे पुतणे आहेत, स्व पतंगराव कदम साहेब याच्या राजकीय जडण घडणीच्या काळापासून व्यंकटराव पवार याचा आणि कुटुंबाचा प्रखरतेने सहभाग आहे.   पै. रणजीत पवार यांचा कुस्ती क्षेत्रात अभिजीत दादा कदम  कुस्ती केंद्र मधून महाराष्ट्रभर लौकिक आहे, पै.रणजीत पवार हे माजी मत्री डाॅ.विश्वजीत कदम साहेब आणि जितेश कदम यांच्या विश्वासू  फळीतील एक धडाडीचा, कर्तृत्ववान, नवका चेहरा मानला जातो.  पै.रणजीत पवार यांना राजकी

सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षणाला पुन्हा एकदा दणका । 367 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना

Image
         सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे सरकारला मोठा धक्का दिला आहे. कोर्टाच्या आधीच्या आदेशानुसार, 367 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका जाहीर केल्या होत्या, त्या ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे सरकारने या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असतानाच निवडणुक आयोगाने आधीच निवडणुका जाहीर केल्या. त्यानंतर इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले. मात्र तत्पूर्वी ज्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधीसूचना जारी करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारने या निर्देशांचे पालन न केल्यास तो कोर्टाचा अवमान ठरेल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि जे बी पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले की, र

नेवरी पंचायत समिती गटामध्ये डॉक्टर विजयराव महाडीक यांच्या नावाची काँग्रेस मधून उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा !

Image
                  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण जाहीर होताच नेवरी गणामध्ये पंचायत समिती इच्छुकांची मोर्चे सुरू झाली आहे.      नेवरी पंचायत समिती गणात नेवरी, भिकवडी, तुपेवाडी, खेरडे वांगी, येतगाव, कान्हरवाडी, आंबेगाव ही गावे असून या गावातील अनेक इच्छुक उमेदवारांची नांदी आणि दिसून येत आहे.      काँग्रेस मधून नेवरी गावचे डॉक्टर विजय महाडीक यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे डॉक्टर विजय महाडिक यांचे सामाजिक कार्य लक्षात घेता नेवरी पंचायत समिती गण मध्ये नाव चांगले चर्चेत आहे.         केलेल्या सामाजिक कार्यामुळे काँग्रेस वरिष्ठ ही विजय महाडीक यांच्या नावावर शिक्का मोर्तब करत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात भाजप तसेच अन्य राजकीय पक्षांमधील उमेदवार निश्चित झाल्यावर चित्र स्पष्ट होईल.

कडेगाव तालुका पंचायत समिती आरक्षण सोडती जाहीर

Image
आगामी पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले असून आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या कडेगाव तालुक्याच्या आरक्षण सोडती आज जाहीर झाल्या आहेत त्या खालीलप्रमाणे  कडेगाव तालुका पंचायत समिती आरक्षण  जाहीर : तडसर : सर्वसाधारण महिला शाळगाव : सर्वसाधारण  कडेपूर : अनुसूचित जाती महिला हिंगणगाव बु. : सर्वसाधारण महिला वांगी : नागरिकांचा मागास प्रवर्ग नेवरी : सर्वसाधारण   देवराष्ट्रे  : सर्वसाधारण चिंचणी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

कडेगाव महावितरण आणि दलाल कॉन्ट्रॅक्टर यांच्यात साटेलोटे आहेत का...?

Image
भ्रष्टाचारकी पोलखोल 2 विज मीटर शिल्लक नसलेमुळे विज कनेक्शन जोडण्यात विलंब होतो किंवा वीज मीटर बाहेरून घ्यावा लागतो बाहेरून म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य ग्राहक मात्र आता ह्या गोष्टीला वैतागले आहेत कडेगाव तालुक्यात अशी दयनीय अवस्था आहे  कडेगाव MIDC आर्थिक भाराखाली आहे असं म्हणणे नक्कीच वावग ठरणार नाही. कडेगाव MIDC च्या बहुतांश कंपन्या बंद स्वरूपात आहेत MIDC वर असणारे टेक्सटाईल झोन उटवल्याननंतर जरी MIDC खुली करण्यात आली असली तरी  नवनवे उद्योग मात्र ह्या कडेगाव ( शिवाजीनगर )  MIDC मध्ये अध्यापही आलेले दिसत नाहीत आणि जे आलेत ते खूप कमी स्वरूपात आहेत त्यातच एखादं इंडस्ट्रियल कनेक्शन घायच म्हंटलं आणि त्यासाठी कडेगावच्या महावितरण मध्ये पदार्पण केल तर तिथुन मीटर शिल्लक नाही अस हमखास उत्तर येतच..! पण यामुळे भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण अधिकारी यांच्याकडून कुत्रीम विज मिटरची टंचाई होत असल्याचा आरोप वीज ग्राहक करत आहेत.  त्यात भर म्हणून काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत ग्राहकाला मिटर नाही म्हणून सांगणे आणि कॉन्ट्रॅक्टरने मीटर मागितल्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट.

Image
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट.         यावेळी सांगली जिल्ह्यातील नगरपालिका,होवू घातलेल्या जिल्हा परीषद निवडणुका तसेच कडेगाव नगरपंचायत निधी या विषयावर चर्चा झाली.  यावेळी सरस्वती एज्युकेशन संस्थेच्या चेअरमन वृषालीताई देशमुख यांनी औक्षण केले तर रविराज देशमुख यांनी सत्कार करण्यात आला.  यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख,स्विकीय सहाय्यक संजय देशमुख, संपतराव काकडे मुंबई तील वरीष्ठ पोलीस अधिकारी उपलब्ध होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना रविराज देशमुख, सोबत भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सौ.वृषालीताई देशमुख व मान्यवर.

कडेगाव मध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड

Image
कडेगाव मध्ये MSEB चा भोंगळ कारभार उघड ! MSEB नक्की कोणाची सर्वसामान्यांची का पिळवणूक करून पैसे उखळणाऱ्या एजंटची..? महाराष्ट्र राज्य विधुत महामंडळ सध्या गरिबांना लुटत आहे तर  गोरगरिबांच्या हक्काचा घास काही लाचार अधिकारी हिरावून घेऊन ते कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या नरड्यात घालत आहेत कडेगावच्या MSEB मध्ये तर हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे TLN मराठीच्या निदर्शनास आले आहे काही रुपयांच्या चिरीमिरीसाठी जर अधिकारी वर्गच विकला जात असेल तर मात्र ही क्लेशदायक बाब आहे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्यातील असलेल्या साटेलोट्यामुळे सर्वसामान्यांचा मात्र हक्क हिरवला जात आहे आणि सदरच्या बाबी उघड झाल्या तर वरिष्ठ अधिकारी मात्र हात वर करून इतरांच्या अंगावर प्रकरण ढकलाढकलीचा प्रकार सध्या सुरू आहे जर वाढीव बिल आले तर गरिबांना ह्या ऑफिस मध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत मात्र कडेगाव मधील काही कॉन्ट्रॅक्टर दलाल यांच्याकडे गेल्यावर कोणतेही काम जास्तीचे पैसे देऊन तात्काळ होत असल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे प्रशासनाने  कडेगावच्या MSEB ऑफिस मध्ये लक्ष घालून हा सगळा प्रकार थांबवा

राज्यातील 92 नगर परिषदा, 4 नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

Image
     17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींची निवडणूक स्थगित करण्यात आलीय. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय यासंदर्भातचे पत्र निवडणूक आयोगाने पुणे, सातारा, सांगली. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने दि. 8 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 दिला होता. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावणी 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे.पुणे, सातारा, सांगली. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या 17 जिल्ह्यांमध्ये नि

कडेगांवचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना स्व: खर्चाने रेनकोट भेट देत जपली ऋणानबंध बांधिलकी.

Image
कडेगांव: परवेझ तांबोळी.         संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे अनेक भागात महापूर आलेला आहे यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून बचाव कार्य केले जात आहे. कडेगाव शहरांमध्ये गेली चार-पाच दिवस पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाचे पाणीपुरवठा  ,आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांना पावसामध्ये काम करावे लागत आहे, या कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना त्रास होऊ नये यासाठी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय(भैय्या)देशमुख यांनी कर्मचाऱ्यांबद्दल ऋणानुबंध बांधिलकी जपत त्यांना स्व: खर्चाने रेनकोट भेट दिले.          रेनकोट भेट दिल्यामुळे नगरपंचायत कर्मचारी  नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या या कार्याबद्दल समाधानाची भावना व्यक्त करत होते.       हा रेनकोट वाटपाचा  कार्यक्रम नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.       यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, नगरसेवक. पै.अमोल डांगे, नगरसेवक.मनोज मिसाळ, विरोधी पक्षनेते. विजय शिंदे,नगरसेवक.श्रीमंत शिंदे, नगरसेवक.हाजी.मुक्तार पटेल,नगरसेवक.युवराज राजपूत, नगरसेवक.अभिजीत लोखंडे नगरसेवक सिद्दीक पठाण,बाळू (तात्या)धर्मे,राकेश जरग यांच

कडेगाव मध्ये शिवतीर्थ निर्माण करण्याची मागणी घेऊन नागरिकांनी दिले नगरपंचायतीला निवेदन

Image
कडेगाव मध्ये शिवतीर्थ निर्माण होवो ही मागणी घेऊन आज बरेच ग्रामस्थांनी कडेगावच्या नगरपंचायतीला निवेदन दिले आहे  नगरपंचायत कडेगाव या ठिकाणी मोठया संख्येने यावेळी नागरिकांची  उपस्थित दिसून आली तर  नागरिकांनी आपल्या निवेदनाद्वारे आवाहन केले की कडेगाव शहरात शिवस्मारका करिता जागा उपलब्ध करून देऊन शिवस्मारकाचे काम देखील लवकर पूर्ण करावे  यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष  धनंजय देशमुख यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले यावेळी  उपनगराध्यक्ष  विजय गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय शिंदे,  आणि सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

ग्रीन पॉवर शुगर्स, लि.गोपूज चे रोलर पूजन संग्राम देशमुख यांच्या हस्ते संपन्न

Image
कडेगांव / प्रतिनिधी :परवेझ तांबोळी.   ग्रीन पॉवर शुगर्स लि.गोपूज या साखर कारखान्याच्या वर्ष २०२२-२३ गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन व प्रतिष्ठापन कार्यक्रम कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष संग्राम (भाऊ)देशमुख.यांच्या हस्ते संपन्न झाले.           यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले गळीत वर्ष २०२२-२३ या गाळप हंगामातील मिलर रोलर पूजन प्रतिष्ठापना कार्यक्रम आज करण्यात येत आहे. फिटिंग,जोडणी व इतर सर्व कामे सुरू आहेत, ट्रक,ट्रॅक्टर, बैलगाडी,ऊस तोडणी मशीन इत्यादीचे वाहतूक करार देखील सुरू आहेत.कारखाना कार्यक्षेत्रातील व गेटकेन क्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे आपला ऊस नोंद करून ऊस आपल्या कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, आपले सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभल्यामुळे आज कारखाना प्रगतीपथावर आहे.          यावेळी संजय बर्गे,सतीश पाटील,महेश घार्गे,जनरल मॅनेजर. हणमंतराव जाधव, असिस्टंट जनरल मॅनेजर.स्वरूप देशमुख, मुख्य शेती अधिकारी.आर.के.पवार, जनरल मॅनेजर फायनान्स.एच.व्ही.पाटील, प्रशासकीय अधिकारी.जगदीश यादव,लेबर ऑफ

कडेगाव येथे १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रशस्तिपत्रक व ट्रॉफीचे वितरण करताना मा.धनश्री वहीनी लाड व अन्य.

Image
कडेगाव /प्रतिनिधी  कुठल्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि कामात प्रामाणिक पणा असेल तर त्या क्षेत्रात यश हे निश्चित भेटेल अशा प्रकारे आपण देशाचे, राज्याचे, जिल्हाचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणार अशी अपेक्षा मा. धनश्री वहीनी लाड यांनी व्यक्त केली.              पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण (आण्णा) लाड व जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव येथे सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. धनश्री वहीनी लाड तर प्रमुख पाहुणे म्हणून रवि बावडेकर होते.  याप्रसंगी सांगली जिल्हा युवती अध्यक्षा पुजाताई लाड, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई मोहिते, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विराज पवार, कडेगाव तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा स्नेहल कदम, कडेगाव पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र करांडे, अतुल न

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला , धरणाच्या पाणीपातळीत होतेय वाढ

Image
विशेष प्रतिनिधी / :  कोयना धरण  पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रतिसेकंद 14 हजार 152 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे धरणाच्या  पाणीसाठ्यात  1 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात 16 टीएमसी एवढा  पाणीसाठा  आहे. कोयना धरण  पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल मोठ्या प्रमाणात  पावसाची नोंद झाली आहे, मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे, पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे.संपुर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला होता. पश्चिमेकडील वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर होती. अशातच आता पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे तर दोन दिवसात पाणीसाठ्यात 2 TMC ने वाढ झाली आहे कोयना धरणातील पाणीसाठा 13 टीएमसीवर आला होता. मात्र, दोन दिवसांत पावसाचे आगमन झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली. तर सध्या 16 टीएमसी एवढी पाणीपातळी असून पावसाचा जोर वाढल्यास पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते 

उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल, अध्यक्ष निवडीवरुन शिवसेना खासदार भडकले

Image
बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई, 03 जुलै :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अखेर आज विधानसभा अध्यक्षाची (Assembly Speaker Election) निवडणूक पार पडली. शिंदे सरकारने आपली पहिली लढाई जिंकली आहे. पण, शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आता न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेने 39 बंडखोर आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर शिंदे गटानेही 16 आमदारांविरोधात व्हीप मोडल्याची तक्रार केली आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयातच निकाली निघणार आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावतं यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अरविंद सावतं? राज्यात ज्या प्रकारे नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या सर्व गोष्टी संविधानानुसार झाल्यात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात नवं सरकार निर्माण करताना राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला निमंत्रण दिले नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून व्ह